🚩
*पानिपत* 💥
✨ *मराठा शौर्य दिवस* ✨
पानिपत काला आम ( हरियाणा प्रदेश ) मराठ्यांच्या शौर्य दिनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय संघटक मयुरा ताई देशमुख तसेच आंतरराष्ट्रीय सहसंघटक वनिताताई अरबट
💫 *काला आम* ⚡
पानिपत येथे शौर्य भूमीवर लाख बांगडी फुटली , रक्ताचे पाट वाहिले. तिकडे महाराष्ट्रात माझी माय _माऊली आपल्या सौभाग्यासाठी संक्रांतीचा सण साजरा करत सौभाग्याचं लेणं वाटत होती..
पण आज का कोण जाणे तिळगुळाचे लाडू गोड नव्हे तर कडू वाटत होते. मन बेचैनीने हुरहुरत होते...
अंगणात खेळणारी मुलं आपल्या वडिलांची वाट पाहत होते, लेकाची वाट पाहत दाराबाहेर येरझाऱ्या घालणाऱ्या म्हाताऱ्या माय ,- बापाचे पाय जड होऊन मधेच थबकत होते, तर उंबऱ्याच्या आत, दारा आडून ... भरल्या डोळ्यांनी घर धन्याची वाट पाहणाऱ्या , कपाळभर ठसठशीत कुंकू लावलेल्या, हिरवा चुडा ल्यालेल्या... सुवासिनी डोळ्याचे निरंजन करून आतुरतेने घरधन्याची वाट पाहत होत्या...
*पण*... क्षणातच सर्व स्वप्ने त्या पानिपताच्या रक्ताच्या पाटात वाहून गेले ...
जिथे मुख्य युद्ध झाले तिथे कधीकाळी दाट आंब्याचे झाडांचे वन, आमराई होती. त्या ठिकाणी रक्ता मांसाच्या चिखलाने ...पुढे ते संपूर्ण आंब्याची झाडे... काळी झालीत, अमराई नंतर कधी हिरवी झालीच नाही बहरली नाही आणि म्हणूनच त्या जागेला *काला आम* असे म्हटले जाते ही *सत्यकथा* स्थानिक मराठा मोठ्या दुःखाने सांगतात..😢
आजच्या दिवशी आम्हाला त्या पावन शौर्य भूमीला नतमस्तक होताना , ती माती कपाळाला लावताना , मन भरुन येत असतानाच आमच्या शूरवीरांच्या पराक्रमाने, स्वाभिमानाने ऊर भरून येत होता*....
धन्य मराठा ...
✍️ मयूराताई देशमुख
आंतरराष्ट्रीय संघटक, जिजाऊ ब्रिगेड
🙏
ता. 14/1/2022
Fill Up Registration Form
आवेदन पत्र भरें
Profile Will be Verified
प्रोफ़ाइल सत्यापित की जाएगी
Search Your Life Partner
अपना जीवन साथी खोजें